कोल्हार वार्ताहार - (प्रमोद कुंभकर्ण ) श्रावण मासानिमित्त कोल्हार येथील ग्रामदैवत भगवती माता मंदिराच्या सभा मंडपात साई सच्चरित्र पारायण सोहळ्यास मोठ्या भक्तिमय व मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला असून श्री साई भगवती ग्रुप व कोल्हार भगवतीपुर ग्रामस्थ यांच्यावतीने होत असलेल्या या पारायण सोहळ्यात सकाळी 6:30 वाजता श्री ची काकड आरती सकाळी 7ते 11ग्रंथ वाचन व श्रींची आरती असे दैनंदिन कार्यक्रम संपन्न होत आहे पारायण व्यासपीठ चालक गणेश महाराज मुसमाडे हे असून दैनंदिन पूजा सुनील काका कुलकर्णी हे करीत आहेत रविवारी पारायण सोहळ्याच्या चौथ्या दिवशी साईबाबांचा जिवंत देखावा पारायण सोहळ्याप्रसंगी सादर करण्यात आला.
साईबाबांची व्यक्तिरेखा ऋषिकेश खांदे यांनी साकारली तर तात्या कोते बायजाबाई लक्ष्मीबाई या व्यक्तिरेखा अनुक्रमे आदित्य चव्हाण, मंगेश वादे, कुंदा वरगुडे, समृद्धी देशमाने ,वैष्णवी गायकवाड यांनी साकारल्या आज पारायण सोहळ्यास अलिबाग पोलीस स्टेशनचे पीएसआय रंजीत गलांडे, विक्रम काळे, महेश तांबे,प्रमोद खर्डे आदी मान्यवरांनी भेटी देऊन साई दर्शन घेतले दुपारी धुपारती करण्यात आली. छगनराव खर्डे, राहुल राऊत, कामगार तलाठी देवकर मॅडम यांच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले यावर्षी 270 वाचक पारायण सोहळ्यात सहभागी झाले असून महिला वाचकांची संख्या लक्षणीय आहे पारायण सोहळा यशस्वी करण्यासाठी स्वप्निल निबे , श्रीकांत खर्डे ,धनंजय दळे ,नारायण पगारे,विकी पाटोळे,ऋषिकेश आमरे किशोर वादे, यांचे सह साई भगवती ग्रुप चे सर्व सदस्य प्रयत्नशील आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post